⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन डायलेसिस मशीनचे लोकार्पण आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले तर रुग्णांच्या सोयीसाठी सावंतवाडी नंतर दोडामार्ग आणि वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात लवकरच प्रत्येकी दोन डायलिसिस मशीन बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
या लोकार्पण सोहळ्या दरम्यान दिली
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या मशीनचे लोकार्पण आज श्री. केसरकर यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. गिरीशकुमार चौगुले, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, सुरेंद्र बांदेकर, देव्या सूर्याजी, परीक्षित मांजरेकर, डाॅ. सुबोध इंगळे, डाॅ. संदीप सावंत, डाॅ. सागर जाधव डाॅ. निखिल अवधूत, भारती मोरे, नारायण राणे, पांडुरंग वजराटकर महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
