दीपक केसरकर:महायुतीची राजकीय परिस्थिती चांगली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान करू नये..
⚡सावंतवाडी ता.०४-: शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर आदेश दिले असून, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल
असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केला.
दोडामार्ग तालुक्यात प्रस्तावित असलेला अम्युझमेंट पार्क, तिलारीचा परिसर आणि रेडीपर्यंतच्या विकासाला चालना देण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल, असे केसरकर म्हणाले. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतील आणि त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारेल असे ते यावळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान (statement) करू नये, असा सल्लाही केसरकर यांनी दिला. यामुळे समन्वयाने काम करणे शक्य होईल आणि विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.