⚡मालवण ता.०४-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही एअर फोर्स, पोलीस, तटरक्षक दल व इतर संरक्षण दलामध्ये आपले करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार आर्मी विभागाकडून एनसीसी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी सहभागी झालेल्या ३२ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी अशा १८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारत सरकार आर्मीकडून उपस्थित राहिलेले ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग सुभेदार बेंनोर साहू ओडिसा आणि CHM राकेश बनसोडे महाराष्ट्र यांचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी स्वागत केले. राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख आणि व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत रनिंग, उंची ,छाती, पुशअप आणि सीटअप तपासण्यात आले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. खोत यांनी केले. प्राचार्य ठाकूर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रा. अन्वेषा कदम यांनी आभार मानले एनसीसीच्या गीतांजली चव्हाण, गौरव चव्हाण, निर्झरा कांबळी आणि कुणाल वेंगुर्लेकर, पूजा मायनाक, प्रसाद बागवे, चिन्मय तारी, विनय खोबरेकर, साहिल मीर, राज लाड, प्रगती भांडे, पूजा पांढरे, दीक्षा झोरे, ईशा दुखंडे, नियती पारकर या कॅडेट्स सह द्वितीय वर्ष एनसीसी कॅडेट्सनी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि नियोजनास सहकार्य केले.
कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष ऍड.समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण, कृ.सी. देसाई शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी यांनी भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.