सावंतवाडी: एका कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात रोजी श्री. निशिकांत तोरस्कर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय, सावंतवाडी येथे धडक दिली. यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अधिकाऱ्यांनी, स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश केंद्रीय स्तरावरून आल्याचे सांगितले. त्यांनी हे लेखी स्वरूपात दिल्यानंतरही, हे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यापुढे स्मार्ट मीटर बसवणाऱ्या सर्व खासगी ठेकेदारांवर कायदेशीर पोलीस ठाणे तक्रार करण्यात येणार असल्याच देखील यावेळी त्यांनी सांगितले.
याच मागणीसाठी दि. १५/०८/२०२५ रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला आहे. स्मार्ट मीटरचे काम जनतेच्या विरोधात असल्याने, स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली..