⚡कणकवली ता.०४-: यू. आय. एस. मीडिया यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे प्रशालाचा विद्यार्थी आयुष अवधीत बागवे (९वी) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे तर याच स्पर्धेत प्रशालेचा तनय सिद्धेश नातू (९ वी) याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील कामगिरीवर विचार व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यभरातून स्पर्धेत ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, ज्ञसहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे