प्रथम क्रमांकासाठी ५ हजारांचे पारितोषिक; २० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशाची मुदत..

सावंतवाडी, ता. ६ : दिवाळीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच किल्ले निर्मितीची परंपरा जतन व्हावी, या उद्देशाने ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’ चॅनेलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही खुल्या गटासाठी भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकाला २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय तीन स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धकांनी स्वतः तयार केलेल्या किल्ल्याचा व्हिडिओ आणि प्रवेश शुल्क गुगल पेच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९४२०११०११७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवायचे आहे.
इतिहास, संस्कृती आणि शिवकालीन गड-किल्ल्यांच्या परंपरेशी नाते जोडणाऱ्या या स्पर्धेत किल्लेप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
