⚡वैभववाडी ता.०६-: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियाना अंतर्गत पंचायत समिती वैभववाडी दिवाळी फराळ महोत्सव २०२६ चे उद्घाटन सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके तहसीलदार सुर्यकांत पाटील गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने व सर्व पंचायत समिती अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
हा दिवाळी फराळ महोत्सव दोन दिवस वैभववाडी शहरात असून या महोत्सवाला तालुक्यात सह ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी भेट देत महोत्सवाचा लाभ घेतला. व दिवाळी फराळाची खरेदी केली.

