सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज हितवर्धक मंडळ, शाखा वेंगुर्लेचा

वेंगुर्ले : प्रतिनिधी-
देवळी समाज मेळावा शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ या वेळेत साई मंगल कार्यालय, सुंदरभाटले येथे तालुकाध्यक्ष रमेश नरसुले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या समाजातील उद्योजक राजन नाईक (कुडाळ) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या देवळी समाज मेळाव्यात समाजातील जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा (पूर्व माध्य. प्राथ.), दहावी व बारावी शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण, पदविका-पदवी परीक्षांमध्ये उत्तीर्ण तसेच ज्या समाज बांधवांनी विविध क्षेत्रात प्राविण्य संपादन केले असेल अशा सर्वांचा गुणगौरव या मेळाव्यात केला जाणार आहे. त्यामुळे सर्व गुणगौरवासाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थी व समाजबांधव यांनी आपल्या प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती अध्यक्ष, उपाध्यक्ष अगर सचिव यांच्याकडे संपर्क साधून मंगळवार, १० नोव्हेंबरपर्यंत सादर कराव्यात. तसेच वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या ज्ञातीबांधवांचा तसेच विवाहाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या ज्ञातीबांधव दांपत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संबधितांनी स्वतः आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणावी. समाजातील नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा सत्कार आपल्या समाजातील जे नवनियुक्त लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले ग्रा.पं. सदस्य, नगरसेवक, पं.स. सदस्य, जि.प.सदस्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे. देवळी समाजातील (तालुका व तालुका बाह्य) उपवर वधू-वर मुला-मुलींसाठी वधू-वर सूचक उपक्रम आयोजित केला आहे. त्यादृष्टीने इच्छुक वधू-वर व त्यांचे पालक यांनी उपस्थित राहून आपल्या पाल्यासंबंधीची माहिती पूर्ण फोटो सहीत अरुण घोगळे, होडावडे किंवा रमा राजेंद्र खानोलकर (९४०४१७२९१४) यांच्याकडे संपर्क साधून द्यावी. सदर देवळी समाज मेळाव्यास तालुक्यातील सर्व समाजबांधव व भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज हितवर्धक मंडळ शाखा वेंगुर्लेचे अध्यक्ष रमेश नरसुले, उपाध्यक्ष शेखर तुळसकर, सचिव रमेश पिंगुळकर यांनी केले आहे.
