बोलेरो पिकपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील छोटी मुलगी जखमी…!

⚡बांदा ता.०४-: बांदा उड्डाणंपूलाखाली बोलेरो पिकपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील छोट्या मुलीला दुखापत झाली. जखमीना रुग्णवाहिकेतून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून बांदा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त बोलेरो चौकातून हायवेवर येत होती तर दुचाकी हायवेवरून जात होती. बोलेरोची धडक बसल्याने दुचाकी चालक त्याची पत्नी व छोटी मुलगी रस्त्यावर कोसळली. स्थानिकांनी तात्काळ जखमीना रुग्णालयात दाखल केले.

You cannot copy content of this page