केसरकरांच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे, वजन कमी झाल्याने मतदार संघात अधिकारी नाहीत…

रुपेश राऊळ: यांची टीका: अधिकारी नसल्याने लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे..?

⚡सावंतवाडी ता.०४-: मतदार संघात अनेक प्रश्न गंभीर आहेत.मतदार संघात अधिकारीच नाहीत, असे असताना केसरकर गप्प का..? की त्यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे वजन कमी झाले की काय असा संशय रुपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान आम्ही विरोधक म्हणून सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे. परंतु स्थानिक आमदार कुठेही या प्रश्नांवर लक्ष देत नाही अनेक जनतेचे प्रश्न आहेत परंतु अधिकारी नाहीत त्यामुळे केसरकर या सर्व गोष्टीत अपयश ठरल्याचा यातून स्पष्ट झाल्याचे राऊळल यांनी म्हटले.

You cannot copy content of this page