⚡कणकवली ता.०४-: शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली गेली अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून याबाबत व्यापारी संघाचे पदाधिकारी नागरीक यांनी संबंधित शासकीय विभागांचे तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर आज ( सोमवारी ) कणकवली नगरपंचायत प्रशासन, कणकवली पोलीस व आरटीओ विभागाचे अधिकारी कर्मचारी सोमवारी सकाळीच ‘ऑन फिल्ड’ उतरले. या तिन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उड्डाणपूल गाठले असून उड्डाणपुलाखालील विविध वाहनधारक, विविध विक्रेते यांना आपापली वाहने, स्टॉल हटविण्याच्या सूचना केल्या जात आहेत. ही कारवाई आरटीओ विभाग, पोलीस प्रशासन व नगरपंचायत च्या संयुक्त सहभागाने केली जात आहे. दरम्यान यावेळी सूचनांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला जात आहे.