बाबुराव धुरी व रुपेश राऊळ यांचा गंभीर आरोप: पालकमंत्री मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहून जिल्ह्याचा अक्का बनायला बघतात का….?
⚡सावंतवाडी ता.०४-: कोट्यावादी चा शासनाचा महसूल बुडून साटेली तर्फ सातार्डा येथील बेकायदा मायनिंग सुरू आहे. लीज एकीकडे आणि उत्खनन दुसरीकडे असा प्रकार आहे. त्यात देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. असा आरोप आज इथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत रुपेश राऊळ व बाबुराव धुरी यांनी केला आहे.
दरम्यान एवढा मोठा भ्रष्टाचार सुरू असताना पालकमंत्री गप्प का..? की पालकमंत्री या मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहून जिल्ह्याचा अक्का बनायला बघतात का असा सवाल राऊळ यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. तसेच केसरकर यांच्या मतदार संघात एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असताना केसरकर गप्प का याआधी देखील मायनिंग मध्ये अनेक दुर्घटना घडली आहेत हे माहिती असताना देखील मायनिंग कसं काय सुरू आहे असा सवाल देखील राऊळ व धुरी यांनी उपस्थित केला.