Headlines

बांदा येथे १८ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर…

⚡बांदा ता.१२-:कोंकण कॅन्सर ॲण्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मातृत्व मेडिकल बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मातृत्व मेडिकल, बांदा (पोस्ट ऑफिसजवळ) येथे पार पडणार आहे. शिबिरात…

Read Full News

नेतर्डे गावात बीएसएनएलची सेवा सुरू…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे नेतर्डे वासियांनी मानले आभार.. ​बांदा/प्रतिनिधीवर्षभराच्या मागणीनंतर अखेर नेतर्डे गावामध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची मोबाईल सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या आदेशाने त्वरीत सेवा सुरू झाल्याबद्दल माजी सभापती प्रमोद कामत यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. नेतर्डे गावात…

Read Full News

स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला बांदा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे नियोजन…

⚡बांदा ता.१२-:७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १४ रोजी बांदा येथे सर्व भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या तिरंगा यात्रेस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गडगेवाडी येथून दुपारी ३ वाजता सुरुवात होईल अशी माहिती भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.ही यात्रा श्रीराम चौक बांदा, हॉस्पिटल…

Read Full News

नेत्र तपासणी शिबिराचा १०७ जणांनी घेतला लाभ…

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यातर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.१२-:मालवणचे माजी नगरसेवक श्री. आप्पा लुडबे यांच्या वतीने वायरी मालवण येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात १०७ जणांची तपासणी करण्यात आली. या शिबिरा दरम्यान मालवण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बालाजी पाटील, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष सावंत आणि…

Read Full News

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांतर्फे कातकरी वसतीगृहाला आर्थिक मदत…

⚡मालवण ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शाखा मालवणच्या वतीने आणि मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या पुढाकारातून जागतिक आदिवासी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जमवलेली ५५ हजार रुपयांची रक्कम वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी निवासी वसतिगृहाला मदत म्हणून वसतिगृहाचे संस्थापक उदय अहिर यांच्याकडे सुपूर्द करण्यात…

Read Full News

उबाठा महिला मालवण उपतालुकाप्रमुख पुजा तोंडवळकर यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.१२-:हडी येथील उबाठा मालवण तालुका महिला उपतालुकाप्रमुख पुजा राजन तोंडवळकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, पुजा तोंडवळकर यांना शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती दिली. आमदार निलेश राणे…

Read Full News

जिल्हापरिषद शाळा क्र. ६ व वि. स. खांडेकर महाविद्यालय मोफत वह्या वाटप…

भाजपच्या माध्यमातून संदिप गावडे यांचा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.१२-: प्रतिवर्षी प्रमाणे संदिप गावडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी देखील श्री गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला. सावंतवाडी येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय शाळा क्र. ६ भटवाडी येथे वाह्यवाटप हा उपक्रम राबविण्यात आला. सन्मानिय प्रदेशाध्यक्ष व…

Read Full News

दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव कारची थांबलेल्या ओम्नीला धडक…

सुदैवाने कोणीही जखमी नाही;चेक पोस्ट समोरील अपघातामुळे चर्चेला उधाण.. बांदा तादारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावर थांबलेल्या ओमनीला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्ट समोरच घडलीअपघातानंतर क्रेटा मधील चालक फरार झाला आहे पोलीस दाखल झाले असून आत मध्ये असलेली दारू जप्त करण्याचे…

Read Full News

वेंगुर्ले येथे गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात…

वेंगुर्ले : प्रतिनिधीगांजा बाळगल्या प्रकरणी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस पथकाने आणखी एक कारवाई केली आहे. मूळ बेळगाव व सध्या हरमल गोवा येथे राहणारा सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्या कडून २६.९२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्री वेंगुर्ले पावर हाऊस जवळ मुख्य रस्त्यावर करण्यात आली….

Read Full News

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद*

भाजपा जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संवाद सभेचे आयोजन.. ⚡ओरोस ता १२-: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांची महसूल विषयक विविध निवेदने स्वीकरणार आहेत. ते दुपारी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.१३…

Read Full News

You cannot copy content of this page