सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांतर्फे कातकरी वसतीगृहाला आर्थिक मदत…

⚡मालवण ता.१२-:
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शाखा मालवणच्या वतीने आणि मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या पुढाकारातून जागतिक आदिवासी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जमवलेली ५५ हजार रुपयांची रक्कम वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी निवासी वसतिगृहाला मदत म्हणून वसतिगृहाचे संस्थापक उदय अहिर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी वसतीगृहातील मुलांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न होऊन वसतिगृहातील मुलींनी उपस्थित मान्यवरांना राख्या बांधल्या. मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विजय चौकेकर यांनी आपला वाढदिवस मुलांच्या सहवासात साजरा करताना वाढदिवसानिमित्त वसतिगृहाला मदत म्हणून ५ हजार रुपयांचा धनादेश श्री.चौकेकर यांनी उदय अहिर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी वैभववाडी येथील सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक संतोष कदम यांनीही मुलांना खाऊ वाटप करून वसतिगृहाला आर्थिक मदत केली.

वसतिगृहाच्या मदतीसाठी विजय चौकेकर यांना तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, त्याचप्रमाणे पंडित माने, काशिनाथ कलंबिसकर, कोमल कदम, अक्षय कदम तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गच्या सदस्यांचेही सहकार्य लाभले. उदय अहिर यांनी मदतीबद्दल आभार मानले. यावेळी विजय चौकेकर यांच्या समवेत सेवानिवृत्त शिक्षक कृष्णा पाताडे, रावजी तावडे, संतोष कदम , माध्यमिक शिक्षक पंडित माने, पोस्टमास्तर काशिनाथ कलंबिसकर, अखिलभारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हासरचिटणीस अजित कानशिडे, जिल्हा युवासंघटक युगांत चव्हाण, दिलीप चव्हाण, अक्षय कदम, सुमन कदम, विशाखा चौकेकर, वैभव चौकेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page