उबाठा महिला मालवण उपतालुकाप्रमुख पुजा तोंडवळकर यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.१२-:
हडी येथील उबाठा मालवण तालुका महिला उपतालुकाप्रमुख पुजा राजन तोंडवळकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, पुजा तोंडवळकर यांना शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती दिली.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मतदार संघात सर्वच ठिकाणी गतिमान विकास होत आहे. याचं विकासकार्यावर प्रेरित होऊन अनेकपक्षप्रवेश शिवसेनेत होत आहेत. आपणही गाव विकासाच्या दृष्टीने शिवसेनेत प्रवेश करतं असल्याचे पुजा तोंडवळकर यांनी सांगितले. हडी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही पुजा तोंडवळकर कार्यरत होत्या.

यावेळी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, शिवसेना मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, नारायण धुरी, युवासेना शहरप्रमुख आनंद पराडकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, शहर संघटक राजू बिडये, नारायण धुरी, विभाग प्रमुख मंदार लुडबे, राजन तोंडवळकर, महिला पदाधिकारी कुडाळ सचिव रेवती राणे, आराध्या करलकर यांसह अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page