नेत्र तपासणी शिबिराचा १०७ जणांनी घेतला लाभ…

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यातर्फे आयोजन..

⚡मालवण ता.१२-:
मालवणचे माजी नगरसेवक श्री. आप्पा लुडबे यांच्या वतीने वायरी मालवण येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात १०७ जणांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरा दरम्यान मालवण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बालाजी पाटील, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष सावंत आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा ज्येष्ठ डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विश्वकर्मा भजन मंडळ वायरी, भरडेवाडा बाल भजन मंडळ वायरी, सातेरी भजन मंडळ देऊळवाडा, सिंधुकन्या फुगडी मंडळ आडवण, रेकोबा ढोलकी भजन मंडळ वायरी, नवश्री भजन मंडळ वायरी या मंडळांना प्रत्येकी दोन प्रमाणे पंढरपुरी टाळ वाटप अतुल काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आप्पा लुडबे व इतर सहकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page