वेंगुर्ले : प्रतिनिधी
गांजा बाळगल्या प्रकरणी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस पथकाने आणखी एक कारवाई केली आहे. मूळ बेळगाव व सध्या हरमल गोवा येथे राहणारा सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्या कडून २६.९२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यरात्री वेंगुर्ले पावर हाऊस जवळ मुख्य रस्त्यावर करण्यात आली. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि.१९८५ चे कलम ८(सी), २०(बी)(ii)(ए) अंतर्गत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पांडुरंग खडपकर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ मेनसे हा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उग्र वास येत असलेला हिरवट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी जात होता. पोलिसांना गस्तीच्या वेळी हा मिळून आला. त्याला मोठी माणसं पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा दाखल केला आहे. या कारवाई वेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक गवारी, सहाय्यक पोलीस फौजदार श्री कुबल, पोलीस हवालदार श्री राऊळ, पोलीस हवालदार श्री जोसेफ डिसोझा, पोलीस हवालदार श्री धुरी, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, पोलीस कॉन्स्टेबल पालकर पोलीस, सरमळकर उपस्थित होते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करत आहेत.
वेंगुर्ले येथे गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात…
