Headlines

गाबीत समाजासाठी ५ सप्टेंबर रोजी मोफत वधू-वर आणि पालक मेळावा

⚡मालवण ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील युवक-युवतींच्या लग्नासंदर्भात अनेक अडचणी येत असल्यामुळे समाजाच्या आग्रहास्तव मालवणमध्ये एका विशेष वधू-वर आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण पेट्रोल पंपाजवळील महाराजा हॉटेल येथे होणार आहे. या मेळाव्यात लग्नासंबंधित समस्यांवर उपाय आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. हा भव्य मेळावा पूर्णपणे विनामूल्य…

Read Full News

प्रा. हसन खान यांचे सेट परीक्षेत यश…!

⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण चे प्रा.हसन खान यांनी भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळविले आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षा आयोजित केली जाते. ४० व्या सेट परीक्षेसाठी १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी…

Read Full News

गणेशोत्सवात कोकण कन्या उशिराने ; सावंतवाडी स्थानकावरील अपुऱ्या सोयींमुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय…!

⚡सावंतवाडी ता.०१-:गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय वाढवत कोकण रेल्वेची २०११२ कोकण कन्या एक्सप्रेस रविवारी दोन तास उशिराने सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली. परिणामी शेकडो प्रवाशांना स्टेशनवर मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे काम अद्याप अपूर्ण असून, प्रवाशांसाठी आवश्यक त्या शेडची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पावसात प्रवाशांना ओलेचिंब होत उभे राहावे लागले. महिलांपासून…

Read Full News

सिंधुदुर्गातून पहिली मराठा टीम उद्या रवाना होणार…

बाबुराव धुरी करणार नेतृत्व : आरक्षणाशिवाय माघार नाही! : केला निर्धार.. सिंधुदुर्ग :संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चार दिवस पूर्ण झाले असून मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. शासनाकडून ठोस निर्णय न घेतल्याने समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरातून या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आता सिंधुदुर्गातूनही आरक्षणाच्या लढ्यात सहभागी…

Read Full News

ठाकरे सेनेचे आमदार आमदार महेश सावंत यांनी बांदा शहरातील घरगुती गणपतीचे घेतले दर्शन…!

⚡बांदा ता.०१-: वरळी मुंबईचे आमदार महेश सावंत यांनी शहरातील बांद्याच्या बाप्पासह घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. काल सायंकाळी उशिरा त्यांनी बांदा शहराला भेट देत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. शहरातील बांद्याचा बाप्पा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे, हनुमान मंदिरातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांच्या…

Read Full News

इन्सुली चेकपोस्ट समोर कंटेनरचा अपघात…!

⚡बांदा ता.०१-: पोलिस ठाणे हद्दीत गोवा मुंबई जाणारे रोड वर इन्सुली चेकपोस्ट समोर कंटेनर क्रं HR 58 E 3732 हा रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाला असून त्यामध्ये कोणीही जखमी नाही. गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत.

Read Full News

मनीष दळवी यांनी घेतले सुधीर आडीवरेकर यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.३१-: जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचेदर्शन घेतले

Read Full News

५ दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप…!

⚡सावंतवाडी ता.३१-: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विधिवत पूजाअर्चा करत लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरणात झाले असून आज ५ दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. रविवारी सायंकाळनंतर मोती तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती…

Read Full News

बांदयातील युग्धा बांदेकरची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड…!

⚡बांदा ता.३१-: बांदा गावातील व सध्या नवोदय विद्यालय सांगेली येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेली युग्धा दिपक बांदेकर हिची छत्तीसगड येथे होत असलेल्या ५२व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.युग्धा बांदेकर हिने इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत बांदा येथील जिल्हा परिषद पीएम श्री बांदा केंद्र शाळेत शिक्षण घेतले आहे. बांदा केंद्र शाळेत शिक्षण घेत असताना…

Read Full News

मोरगाव जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.३१-: मोरगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नं.१ व मोरगाव गावठण या जशाळांतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोरगाव जिल्हा परिषद केंद्र शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या स्नेहमेळाव्यास सरपंच संतोष आईर अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच देविदास पिरणकर, माजी सरपंच आप्पा कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर, सेवानिवृत्त कॅप्टन वामन नाईक, नंदलाल पिरणकर, सत्यवान नाईक,प्रमोद बांदेकर,…

Read Full News

You cannot copy content of this page