प्रा. हसन खान यांचे सेट परीक्षेत यश…!

⚡मालवण ता.०१-: 
मालवण येथील स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण चे प्रा.हसन खान यांनी भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळविले आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षा आयोजित केली जाते. ४० व्या सेट परीक्षेसाठी १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दि.३० ऑगस्ट रोजी परीक्षेचा निकाल ६. ६९ टक्के लागला असून फक्त ६,०५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रा. हसन खान यांनी उत्तीर्ण होत यश मिळविले. प्रा. खान हे पर्यावरण व भूगर्भ अभ्यासक असून करवंटी व बांबूपासून विविध वस्तू तयार करतात. यासाठी त्यांचा विकल्प हा ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे. तसेच अनेक विषयांवर त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले असून अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या यशाबद्दल त्यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page