गाबीत समाजासाठी ५ सप्टेंबर रोजी मोफत वधू-वर आणि पालक मेळावा

⚡मालवण ता.०१-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील युवक-युवतींच्या लग्नासंदर्भात अनेक अडचणी येत असल्यामुळे समाजाच्या आग्रहास्तव मालवणमध्ये एका विशेष वधू-वर आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण पेट्रोल पंपाजवळील महाराजा हॉटेल येथे होणार आहे. या मेळाव्यात लग्नासंबंधित समस्यांवर उपाय आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.

हा भव्य मेळावा पूर्णपणे विनामूल्य असून त्याचा उद्देश गाबीत समाजातील मुला-मुलींच्या विवाहासाठी योग्य जोडीदार शोधण्यात मदत करणे हा आहे. यावेळी मधुचंद्र वधू-वर संस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र वस्त आणि समाजातील ज्येष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. लग्नास विलंब का होत आहे, लग्न जमवण्यासाठी काय करावे, यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे. आयोजकांनी सर्व वधू-वर आणि पालकांना आवाहन केले आहे की, कोणताही संकोच न बाळगता या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची समस्या सोडवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मेळाव्याला येताना वधू किंवा वराने आपली संपूर्ण माहिती असलेली पत्रिका सोबत घेऊन यावी. मालवण, देवगड, वेंगुर्ला, गोवा आणि कारवार भागातील विवाहोत्सुक गाबीत समाजातील मुला-मुलींनी या मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सुरेश बापर्डेकर ८१०४७४८६३७, विजय राऊळ ९४२३०५२९१४, नारायण जाधव ९८६७५०६६२७, धनश्री चोडणेकर ८२७५३४११२० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page