⚡बांदा ता.३१-: बांदा गावातील व सध्या नवोदय विद्यालय सांगेली येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेली युग्धा दिपक बांदेकर हिची छत्तीसगड येथे होत असलेल्या ५२व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
युग्धा बांदेकर हिने इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत बांदा येथील जिल्हा परिषद पीएम श्री बांदा केंद्र शाळेत शिक्षण घेतले आहे. बांदा केंद्र शाळेत शिक्षण घेत असताना विविध स्पर्धांत सहभागी होऊन सुयश मिळवले होते.राष्ट्रीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेतही तिने राष्ट्रीय पातळीवर सुयश प्राप्त केले होते.शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान मिळवित सहावी इयत्तेत केंद्रीय नवोदय विद्यालय सांगेली येथील तिची निवड झाली होती.
छत्तीसगड येथे १ते ५सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या ५२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी युग्धाने बांदेकरने नैसर्गिक शेती व शेती करण्याची पध्दती या विषयावर सादर केलेल्या प्रतिकृतीची निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे युग्धाने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून तिला राष्ट्रीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बांदयातील युग्धा बांदेकरची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड…!
