⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल शनिवारी (२१ रोजी) शहरातील प्रभाग क्रमांक ४, ५ व ९ येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत आरोग्य सभापती श्री. सुधीर आडीवरेकर, नगरसेवक श्री. देवेंद्र टेमकर, श्री. अजय गोंदावळे, सौ. सायली दुभाषी, सौ. निलम नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक, जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील शिक्षक व विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था तसेच सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आरोग्य सभापती श्री. सुधीर आडीवरेकर यांनी नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ई-कचरा संकलन मोहिमेबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. स्वच्छता ही केवळ मोहिमेपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग व्हावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच नरेंद्र डोंगरावर स्वच्छता मोहीम राबविताना माकडांनीही आपणास स्वच्छता करण्यास सहकार्य केले, असल्याचे आडिवरेकर यांनी सांगुन माकडांचे आभार व्यक्त केले. महास्वच्छता मोहिमेमुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून आले. .
सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम…
