५ दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप…!

⚡सावंतवाडी ता.३१-: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विधिवत पूजाअर्चा करत लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरणात झाले असून आज ५ दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. रविवारी सायंकाळनंतर मोती तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन सुरू होते. ग्रामीण भागात देखील ५ दिवसांच्या गणेशाला पुढच्यावर्षी लवकर येण्याच वचन घेत जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. भजन, आरती, फटाक्यांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावाने गणराला निरोप देण्यात आला. मोती तलाव येथे विसर्जनस्थळी नगरपालिकेतर्फे खास आयोजन करण्यात आले. पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांची जातीनीशी उपस्थित राहत पाहणी केली. पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. गणेशभक्तांना कोणतीही समस्या भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था केली होती.

You cannot copy content of this page