Headlines

निलेश राणे मंत्री होऊ दे रे म्हाराजा…

आमदार निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन:राणे कटुंबियांवर गणपती बाप्पाचा नेहमीच वरदहस्त,आम. निलेश राणे यांनी व्यक्त केली बाप्पाप्रती कृतज्ञता.. ⚡कुडाळ ता.०२-: निलेश राणे हे सिंधुदुर्ग राजाच्या कृपाशीर्वादाने आमदार झाले तसे ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होऊ दे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, हे गणराया ती इच्छा तू पूर्ण कर असे साकडे आज सिंधुदुर्ग राजा चरणी घालण्यात…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न अधुरेच,पण गणेशोत्सवातील नियोजनामुळे कोकणवासीयांना दिलासा…!

⚡सावंतवाडी,ता.०२-: कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे, आणि तिचे सावंतवाडी येथील परिपूर्ण टर्मिनस गेले दशकभर केवळ कागदावरच आहे. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच हे एक ‘प्रलंबित स्वप्न’ बनले आहे. तरीही, यंदाच्या गणेशोत्सवात रेल्वे प्रशासनाने केलेल्या विशेष नियोजनामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यासाठी आशेचा एक किरण दिसू लागला आहे. गणेशोत्सवातील विक्रमी नियोजन – यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने अंदाजे…

Read Full News

सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची घेतली भेट…

कणकवली : अन्न व औषध प्रशासन विभाग, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चाही झाली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सहायक आयुक्त ललित गायकवाड यांचे स्वागत केले.

Read Full News

कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी घेतली पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट…

⚡कणकवली ता.०२-: सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. पदभार स्वीकारल्यावर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान विभागाच्या काम – काजाबाबत चर्चा झाली. पावसामध्ये तसेच सणासुदीला सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते सुस्थितीत ठेवावेत अशी सूचना पालकमंत्री नाम….

Read Full News

आमदार निलेश राणे यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०२-: शिंदे शिवसेना कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा मुलगा सार्थक सावंत गुरुनाथ राऊळ, महादेव राऊळ, तुषार राऊळ,आर्यन राऊळ ,आदी उपस्थित होते

Read Full News

सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची घेतली भेट…!

⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नुकताच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट घेतल्यावर मंत्री नाम. नितेश राणे यांनीही जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांचे स्वागत केले.

Read Full News

शिवसेनेच्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर…

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केली होती स्पर्धा:साई तळवणेकर, सत्यवान राऊळ, तुषार आजगावकर विजेते.. ⚡कुडाळ ता.०१-: आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर, द्वितीय क्रमांक कुडाळेश्वरवाडी येथील सत्यवान राऊळ, तृतीय क्रमांक लक्ष्मीवाडी येथील तुषार आजगावकर तर उत्तेजनार्थ श्रीरामवाडी येथील विघ्नेश पाटील यांनी क्रमांक पटकावले. या…

Read Full News

कालवणकर कुटुंबीयांच्या घरी गौराईचे मंगलमय आगमन; परंपरेचा आणि उत्साहाचा अनोखा संगम…

⚡सावंतवाडी ता.०१-:गणेशोत्सवाच्या उत्साहात, सहाव्या दिवशी येणाऱ्या गौराईच्या आगमनाने वातावरणात अधिकच मांगल्याची भर पडते. याच मंगलमय दिनी निरवडे येथील प्रसिद्ध कालवणकर कुटुंबीयांच्या घरी मोठ्या भक्तीभावाने आणि जल्लोषात गौराईचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण कालवणकर कुटुंब या सोहळ्यासाठी एकत्र आले असून, त्यांच्या घरात चैतन्य आणि उत्साहाला जणू उधाण आले आहे.कुटुंबप्रमुख श्री. राजन शांताराम कालवणकर आणि त्यांच्या पत्नी…

Read Full News

मालवण नगरपालिकेचे गणेशोत्सव नियोजन कागदावरच…

प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन नाही:युवा व्यापारी महेंद्र पारकर यांची टिका.. ⚡मालवण ता.०१-:मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत फक्त कागदावरच नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपूर्ण मालवण शहारात हेच चित्र असून नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराची तक्रार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मालवण येथील युवा व्यापारी महेंद्र उर्फ मयु…

Read Full News

चेंदवणच्या सौ सुधा कांबळी आणि सौ वंदना टुंबरे रोटरी न्यूज मासिकाच्या मुखपृष्ठावर..

कुडाळ रोटरी क्लबच्या फळझाडरोप वितरणाचीआंतरराष्ट्रीय स्तरावर दखल.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावच्या महिला शेतकरी सौ सुधा सुधाकर कांबळी व सौ वंदना बाळा टुंबरे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोटरी न्यूज मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्या आहेत. रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर, माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक आयोजित चेंदवण – कवठी मधील ३०० महिला शेतकऱ्यांना…

Read Full News

You cannot copy content of this page