मालवण नगरपालिकेचे गणेशोत्सव नियोजन कागदावरच…

प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन नाही:युवा व्यापारी महेंद्र पारकर यांची टिका..

⚡मालवण ता.०१-:
मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत फक्त कागदावरच नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपूर्ण मालवण शहारात हेच चित्र असून नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराची तक्रार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मालवण येथील युवा व्यापारी महेंद्र उर्फ मयु पारकर यांनी दिली आहे.

यावर्षी मालवण शहरासाठी गणेशोत्सव नियोजनाची बैठकच मुळात अनेकवेळा रद्द करून गणेशोत्सव चार दिवस अगोदर घेण्यात आली. त्यातही प्रमुख अधिकारी नव्हते. त्यावेळी अनेक मुद्दे उपस्थितानी मांडले. मात्र त्यावर अपेक्षित कोणतीही कार्यवाही झाली नाही. शहरातील रस्त्यावरील अनेक खड्डे भरले नाहीत. मोक्याचा ठिकाणी साफसफाई नाही. अनेक ठिकाणी गटर साफसफाई अर्धवट झाल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी योग्य सुविधा नाहीत. रस्त्याचे काम केले नाही तसेच काही ठिकाणी स्लोप वर शेवाळ आल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. गवंडीवाडा येथील गणपती विसर्जन ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा असून रस्त्यावर सांडपाणी वाहणे अश्या अनेक तक्रारी आहेत. याचा परिणाम गणपती बाप्पा आगमन व विसर्जन मार्गांवर दिसून आला.

याबरोबर भटके कुत्रे यांची समस्या अधिकच तीव्र बनली आहे. हे कुत्रे अनेकांच्या अंगावर धावून येतात. तसेच मोकाट जनावरे यांचीही समस्या गंभीर आहे. त्यावरही कोणतीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे या सर्व कारभाराची तक्रार जिल्हाधिकारी यांसह पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे महेंद्र पारकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page