⚡बांदा ता.०१-: वरळी मुंबईचे आमदार महेश सावंत यांनी शहरातील बांद्याच्या बाप्पासह घरगुती गणपतीचे दर्शन घेतले.
काल सायंकाळी उशिरा त्यांनी बांदा शहराला भेट देत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. शहरातील बांद्याचा बाप्पा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे, हनुमान मंदिरातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेल्या गणपतीचे देखील त्यांनी दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य तथा बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, अशोक धुरी, ओंकार नाडकर्णी, निखिल मयेकर, राजा सावंत, ज्ञानेश्वर येडवे, सुनील नाटेकर, सुंदर गवंडी, मिलिंद सावंत, सर्वेश गोवेकर, राजेश पावसकर आदी उपस्थित होते.
