Headlines

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यात विशाल परब यांचा सहभाग…

⚡सावंतवाडी ता.०२-: एका पणतीची प्रखर राष्ट्रवादाची धगधगती मशाल होताना पाहणे अभिमानाचे आणि आनंदाचे आहे. शताब्दीकडे पोहोचलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीत आपल्या जीवनाला तनमनधनपूर्वक राष्ट्रसमर्पित केलेल्या हजारो ज्ञातअज्ञात स्वयंसेवकांचा असीम त्याग आहे. अनेकांच्या रुधीरबलिदानातून हिंदुत्वाचे प्रतीक असलेला हा केशरी ध्वज अधिकाधिक तेजोयुक्त होत विश्वावर फडकत आहे. या पवित्र गंगेला धरतीवर आणण्यासाठी भगीरथासम अहर्निश ध्येयसाधना करणाऱ्या संघसंस्थापक…

Read Full News

शेर्ले ग्रामस्थांचा संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश…!

⚡सावंतवाडी ता.०२-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आपले नेते तथा माजी शिक्षण मंत्री व चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे आ. दीपक केसरकर आणि शिवसेना पक्षाला आज अनोखी भेट दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या अनोख्या शुभेच्छा संजू परब यांच्या माध्यमातून शिवसेनेला मिळाल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख…

Read Full News

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी…

स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव”… ⚡देवगड ता.०१-:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबाव येथील शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांसोबत त्यांनी संवाद साधला व संघ कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित संचलनातही नितेश राणे स्वयंसेवकांसोबत उत्साहाने सहभागी…

Read Full News

निवजे चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आमदार निलेश राणे यांचा दिलासा…

पीडित कुटुंबियांना मदत मिळवून देणार.. कुडाळ : कुडाळ तालुक्यात निवजे गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी केली. पीडित आणि नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी माणगाव खोऱ्यातील निवजे गावात चक्रीवादळाने गावातील घरांचे मोठे नुकसान झाले. होते. या शक्तिशाली वादळाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक…

Read Full News

विशाल परब यांनी घेतले सावंतवाडी बाजारपेठेतील दुर्गामातेचे दर्शन…!

सावंतवाडी ता.०१-: भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडी बाजारपेठ आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देत दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक केसरकर, सुधीर आडीवरेकर, बिट्टू सुखी, सत्या बांदेकर, सविता टोपले मुंज, नंदू गावकर, राजू धार पवार आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Read Full News

इन्सुली क्षेत्रफळवाडीत पट्टेरी वाघाचे दर्शन…

बांदामुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ, सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळवाडी नजीकच्या जंगलात पट्टेरी वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या एका खडकावर हा भव्य पट्टेरी वाघ दिसल्याने, या भागातील त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेली अनेक वर्षे या संवेदनशील नैसर्गिक पट्ट्याला ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ घोषित करण्यासाठी लढणाऱ्या पर्यावरण प्रेमींच्या संघर्षाला मिळालेले एक मोठे बळ…

Read Full News

पालकमंत्री विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी लावतायत…

राजन तेली:पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाला झुकले नाही.. कणकवली : सत्ता असल्‍याने जिल्ह्याचे पालकमंत्री विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून माझी चौकशी लावत आहेत. पण मी घाबरत नाही. कुठल्‍याही तपास यंत्रणांना सामोरे जाण्यास तयार आहे. पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर कारवाईचा प्रयत्‍न झाला. पण पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांच्या दबावाला झुकले नाहीत. आता सीबीआयची भीती दाखवली जातेय. पण आम्ही घाबरत नाही….

Read Full News

सुकळवाड ग्रामपंचायतीत ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानांतर्गत स्वच्छता प्रतिज्ञा…!

⚡मालवण,ता.०१-:सुकळवाड ग्रामपंचायत येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उत्साहाच्या वातावरणात स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती. सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्वच्छता प्रतिज्ञेच्या वेळी वृषाली गरुड, वैदेही मोरजकर, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव मसुरकर, माजी सभापती प्रसाद मोरजकर, माजी उपसरपंच स्वप्निल…

Read Full News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ५ ऑक्टोबरला मालवणात श्री विजयादशमी उत्सव…

⚡मालवण ता.०१-:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका शाखेने यावर्षीचा श्री विजयादशमी उत्सव दि. ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते ६.१५ या वेळेत कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. विजयादशमी हा हिंदू संस्कृतीतील असूरी शक्तींवरील दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक असलेला उत्सव. समस्त जीवसृष्टीच्या कल्याणाचा विचार घेऊन साजरा केला जातो. १९२५…

Read Full News

पर्यटन सप्ताहामधील स्पर्धांचा निकाल जाहीर…!

⚡मालवण ता.०१-:मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्रामध्येआयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या मेगल डिसोजा ही प्रथम आली तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक सपना संतोष रासम ही प्रथम आली मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्राचेआयोजन…

Read Full News

You cannot copy content of this page