Headlines

गरजूंसाठी नॅब नेत्र रुग्णालयात ७ ऑक्टोबरला विशेष नेत्र तपासणी शिबिर…

⚡सावंतवाडी ता.०४- नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला तसेच प्रौढ महिला व पुरुषांसाठी बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात अनुभवी व कुशल नेत्रतज्ज्ञांमार्फत विविध प्रकारच्या दृष्टीदोषांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना अत्यंत कमी खर्चात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सुविधाही दिली जाणार आहे. शिबिरातील रुग्णांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे होणार आहे. सावंतवाडी शहरासह नजीकच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लब, सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ. वैभवी शेवडे व सचिव सौ. दर्शना रासम विशेष प्रयत्न करत आहेत. ही माहिती नॅब संस्थेचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर व सचिव सोमनाथ जिनी यांनी दिली.

You cannot copy content of this page