सुकळवाड ग्रामपंचायतीत ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानांतर्गत स्वच्छता प्रतिज्ञा…!

⚡मालवण,ता.०१-:
सुकळवाड ग्रामपंचायत येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उत्साहाच्या वातावरणात स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती. सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्वच्छता प्रतिज्ञेच्या वेळी वृषाली गरुड, वैदेही मोरजकर, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव मसुरकर, माजी सभापती प्रसाद मोरजकर, माजी उपसरपंच स्वप्निल गावडे, पंचायत समिती अधिकारी श्री. पळसंबकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी उपस्थित होत्या. त्यांनी अभियानाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमात सुकळवाड गावातील सर्व ग्रामस्थ व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी ‘स्वच्छ व सुंदर गाव’ बनवण्याची प्रतिज्ञा घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्याचा संकल्प केला.

You cannot copy content of this page