⚡मालवण ता.०१-:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका शाखेने यावर्षीचा श्री विजयादशमी उत्सव दि. ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते ६.१५ या वेळेत कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
विजयादशमी हा हिंदू संस्कृतीतील असूरी शक्तींवरील दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक असलेला उत्सव. समस्त जीवसृष्टीच्या कल्याणाचा विचार घेऊन साजरा केला जातो. १९२५ साली विजयादशमीच्या मंगल मुहूर्तावर स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक वाटचालीच्या निमित्ताने हा विजयादशमी उत्सव विशेष असणार आहे. या कार्यक्रमात संघाने आजपर्यंत केलेली वाटचाल आणि भविष्यातील समाज परिवर्तन कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी डॉ. बापूजी साबजी परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विश्व हिंदू परिषद रत्नागिरी विभाग मंत्री विवेक वैद्य हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. निवेदक म्हणून मालवण तालुका कार्यवाह रत्नाकर कोळंबकर हे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी, संघ स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
