⚡मालवण ता.०१-:
मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये
आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या मेगल डिसोजा ही प्रथम आली तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक सपना संतोष रासम ही प्रथम आली
मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्चासत्राचे
आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्राच्या निमित्ताने कोकण जिओग्राफर असोसिएशन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने निबंध, पोस्टर, वक्तृत्व, लोकनृत्य अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला. पाच राज्यांमधून निबंध आणि पोस्टर जमा झाले होते. या अंतर्गत १५ निबंध, १८ पोस्टर, आठ वक्तृत्व स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मेगल डिसोजा (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय क्रमांक सपना सत्यवान नाईक (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), रॉयल खैतान बुलेटो (फोडाघाट कॉलेज) यांना विभागून, तृतीय क्रमांक तनिष्कां विनय दळवी (स. ह. केळकर कॉलेज देवगड), मयुरी संजय पाटील (गारगोटी कॉलेज) यांना विभागून, उत्तेजनार्थ – ऋतुजा रामचंद्र कवटकर (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक रासम सपना संतोष (फौंडाघाट कॉलेज), द्वितीय क्रमांक देसाई निकिता प्रकाश (गारगोटी कॉलेज), तृतीय क्रमांक कदम स्नेहल महेश (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), श्रीराम गावडे (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) यांना विभागून देण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नीता धुरी (फोंडाघाट कॉलेज), द्वितीय क्रमांक श्रावणी गावडे (एस. पी. के. लॉ कॉलेज सावंतवाडी), पल्लवी गावडे (गारगोटी कॉलेज), तृतीय क्रमांक मिसबा काझी (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), उत्तेजनार्थ एंजल गोसावी (स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण). लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक फोंडाघाट कॉलेजने सादर केलेले आदिवासी नृत्य, द्वितीय क्रमांक स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे कोळीनृत्य, तृतीय साक्षी परब आणि सानिया कदम (स. का. पाटील) यांचे लोकनृत्य. या स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरुप ट्रॉफी, डिक्शनरी, प्रमाणपत्र व मेडल असे होते
बक्षीस वितरण समारंभासाठी धवल पांड्या, (गुजरात), डॉ अंशू वर्मा (राजस्थान), संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव गणेश कुशे, सदस्य शैलेश पावसकर, डॉ. रामचंद्र काटकर, स्कूल कमिटी अध्यक्ष विजय केनवडेकर, अंतर्गत हमी कक्ष समिती सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर, प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर, अंतर्गत हमी कक्षाच्या समन्वयक डॉ सुमेधा नाईक आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी कोकण जिओग्राफरचे सचिव डॉ. राजाराम पाटील, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. उज्वला सामंत, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले यांचे सहकार्य लाभले.
