जागतिक पर्यटन दिननिमित्त लायन्स क्लब मालवणचा उपक्रम

मालवण दि प्रतिनिधी :
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पर्यटन क्षेत्रात कार्यरत दोन महिला व्यावसायिकांचा प्रतिनिधिक स्वरूपात विशेष सन्मान करण्यात आला.
चिवला बीच येथील खुशी होम स्टेच्या मालक महिमा मयेकर तसेच हॉटेल सिल्वर सॅन्डच्या मालक श्रीमती परब मॅडम यांचा लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने सन्मान करून त्यांच्या पर्यटन क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
मालवणच्या पर्यटन विकासात स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची असून, महिला उद्योजिकांनी पर्यटन व्यवसायात निर्माण केलेले स्थान कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
मालवणला लाभलेला निसर्ग, समुद्रकिनारे आणि स्थानिक संस्कृती यामुळे पर्यटनाला मोठी संधी असून, पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक व्यावसायिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. असेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, मुकेश बावकर, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, विश्वास गावकर, मनाली दळवी, अन्वेषा आचरेकर, रूपा कांदळगावकर, फॅनी फर्नाडिस आदी उपस्थित होते.
