⚡सावंतवाडी ता.२८-: क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी यांच्यातर्फे कणकवली येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी चमकदार खेळ करुन विभागस्तरीय बुदधिबळ स्पर्धेत प्रवेश मिळवला. मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदूरकर, गार्गी सावंत, आहना पालव, चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो या पाच विदयार्थ्यांची सांगली येथे होणा-या विभाग स्तरावरील बुदधिबळ स्पर्धेत निवड झाली. मागील दहा वर्षात ॲकेडमीच्या बहुतांश विदयार्थ्यांची शालेय स्पर्धेत विभाग आणि राज्य स्तरावर निवड झाली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवणारी मुक्ताई ॲकेडमी ही कोकणातील एकमेव ॲकेडमी आहे.
जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणारी राष्ट्रीय कॅरम खेळाडू साक्षी रामदूरकर हीने सलग पाच वर्षे विभाग स्तरावर निवडुन येण्याचा बहुमान प्राप्त केला. सतरा वर्षाखालील गटात साक्षीने तिसरा क्रमांक मिळवला. आंतरराष्ट्रीय रेटेड बुदधिबळ खेळाडू गार्गी सावंत चौदा वर्षाखालील गटात पहिला क्रमांक मिळवून सलग तीन वर्षे विभाग स्तरावर निवडुन आली. आपल्या गटात सलग तीन वर्षे गार्गीने निर्विवाद वर्चस्व ठेवले. मुक्ताई ॲकेडमीची कुडाळ येथील विदयार्थिनी आहना पालव हीने पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेऊन चौदा वर्षाखालील गटात दूसरा क्रमांक पटकावला. लिएण्डर पिंटो याने स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन चौदा वर्षाखालील गटात दूसरा क्रमांक पटकावला. ॲकेडमीचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू चिदानंद रेडकर याने चौदा वर्षाखालील गटात तिसरा क्रमांक मिळवला.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर आणि राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. सर्व विदयार्थ्यांची सांगली येथे होणा-या विभागस्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करुन पुढे होणा-या विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातुन यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

