⚡बांदा ता.२७-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस तसेच माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते.
