शेर्ले ग्रामस्थांचा संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश…!

⚡सावंतवाडी ता.०२-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आपले नेते तथा माजी शिक्षण मंत्री व चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे आ. दीपक केसरकर आणि शिवसेना पक्षाला आज अनोखी भेट दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या अनोख्या शुभेच्छा संजू परब यांच्या माध्यमातून शिवसेनेला मिळाल्या आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील पानोसेवाडी येथील ग्रामस्थ प्रकाश राऊळ, अनिल राऊळ, महादेव राऊळ, मनोहर राऊळ, प्रभाकर राऊळ, अरुण राऊळ, देविदास राऊळ, समीर पोखरे, सागर राऊळ, तुषार राऊळ, पंचशीला जाधव, प्रशांत जाधव, चैताली जाधव यांनी आज शेर्ले सरपंच प्रांजल जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना अर्थातच शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष बबन राणे, तसेच शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते परीक्षित मांजरेकर, शिवसेनेचे तरुण तडफदार शाखाप्रमुख अनिल पिंगुळकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.

यावेळी शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, तसेच शाखाप्रमुख अनिल पिंगुळकर व बाबा धुरी, समीर पालव यांसह अन्य उपस्थित होते.

दरम्यान यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश केलेल्या तमाम ग्रामस्थांचे शिवसेनेत स्वागत असून त्यांच्या गावातील कोणत्याही समस्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून तात्काळ सोडविल्या जातील. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, प्रशासकीय स्तरावर सर्व समस्यांना सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून शेर्ले गावाचा विकास जास्तीत जास्त शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल, असे अभिवचन दिले.

You cannot copy content of this page