Headlines

सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पा चिंदरकर…

⚡बांदा ता.२७-: बांदा येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर मंडळाची बैठक शनिवारी (ता. २७) रात्री आनंदी मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पा बाबुराव चिंदरकर, उपाध्यक्षपदी सुभाष शिरोडकर, सचिवपदी पुरुषोत्तम पेडणेकर, खजिनदारपदी सलील वळंजू, तर सहसचिवपदी बाळा आकेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. उत्सव काळात भाविक व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो:-
बांदा कट्टा कॉर्नर नवरात्र मंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

You cannot copy content of this page