Headlines

बांद्यात मध्यरात्री चोरट्यांचा सुळसुळाट; चार दुकाने फोडून रोकड लंपास…!

बांदा/प्रतिनिधीबांदा दाणोली मार्गावरील विलवडे वडाकडील दोन भुसारी दुकाने आणि सलून मध्यरात्री चोरट्याने फोडून ऐवज लंपास केला. यामधून चोरट्याच्या हाती किती मुद्दे माल लागला हे पोलीस तपासात सिद्ध होणार असून बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही तिन्ही दुकाने भर वस्तीत असूनही चोरट्याने शीताफिने चोरी केली असल्याने आणि हे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण…

Read Full News

निराधार वृद्धांसाठी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चा जिव्हाळा उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.१०-: समाजात आजही अनेक निराधार वृद्धं व्यक्ती आधाराच्या शोधात भटकताना दिसतात. अशा वेळी आश्रम आणि सामाजिक संस्थांचं कार्य त्यांच्यासाठी दिलासा ठरतं. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शिरोडा येथील जिव्हाळा सेवाश्रमात अलीकडेच एका निराधार वृद्धाला आश्रय मिळाला आहे.या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निराधार वृद्धांना आश्रमात सुरक्षित निवास मिळवून देण्यात आला आहे. “अश्रय मिळवून देताना त्यांच्या डोळ्यातील…

Read Full News

मोती तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या…?

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रात्री घडली. ही व्यक्ती सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राजवाड्याच्या समोरील तलावाजवळ ही घटना घडली असून, घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, सावंतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तलावातील शोधमोहीम सुरू आहे.

Read Full News

झाराप तिठा येथे मोबाईल शॉपीत चोरी…

कुडाळ : तालुक्यात झाराप तिठा येथील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यानी इअरबड्स व अन्य साहित्य आणि रोख ५ हजार मिळून १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शॉपी मालक वैभव गुरुनाथ कांडे (27) रा वजराट कांदेवाडी यांनी कुडाळ पोलीसांत खबर दिली आहे.बुधवारी रात्री नऊ वा ते आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या मुदतीत चोरट्याने…

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा गणित संबोध परीक्षेत शानदार यश…!

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ मार्फत इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या गणित संबोध परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधून एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,पैकी 33 विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये मयुरेश राकेश मोर्ये व अथर्व सखाराम गावडे यांनी 92 गुण मिळवून…

Read Full News

प्रवाशांच्या गैरसोयी व गैरप्रकारांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे बांदा बसस्थानकात निवेदन…!

⚡बांदा ता०९-: बांदा बसस्थानक परिसरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बांदा बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना युवासेना उपतालुकाप्रमुख रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, सुरक्षेअभावी निर्माण झालेली प्रवाशांची गैरसोय तसेच असामाजिक प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर या सर्व बाबींचा निवेदनात विशेष उल्लेख करण्यात आला.निवेदनात नमूद…

Read Full News

आंजीवडे सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरणसाठी ५ लाख निधी…

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न.. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.आंजीवडे गावच्या ग्रामदेवता मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार…

Read Full News

“फळ-पिक विमा रकमेच्या विलंबाविरोधात सिंधुदुर्गात ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ आंदोलन”…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ८-: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फळ पिक विम्याचे पैसे तात्काळ दया, शेतकऱ्यांची हेळसांड करणाऱ्या विमा कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करा, कृषी मंत्र्यांना पदावरून हटवा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ धरणे आंदोलन करण्यात आले . महाविकासआघडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,फळ बागायतदार शेतकरी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संखेने सहभागी…

Read Full News

संजू परब यांचा ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का…

मळेवाड सोसायटीचे चेअरमन व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश: तर मळेवाडी जिल्हा परिषद वर शिवसेनेचा भगवा फडकवणार.. ⚡सावंतवाडी ता.०९-: मळेवाड गावातील सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि उबाठा विभागातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत आज जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजू परब यांनी नव्या कार्यकर्त्यांचे उत्साहात…

Read Full News

शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे उद्या जिल्ह्यात आगमन…

बांदा सावंतवाडीत होणार जंगी स्वागत: संजू परब यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०९-: शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे उद्या जिल्ह्यात आगमनशिवसेना (शिंदे गट) मध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे उद्या जिल्ह्यात आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता बांदा येथे निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा जंगी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला…

Read Full News

You cannot copy content of this page