शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे उद्या जिल्ह्यात आगमन…

बांदा सावंतवाडीत होणार जंगी स्वागत: संजू परब यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.०९-: शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे उद्या जिल्ह्यात आगमनशिवसेना (शिंदे गट) मध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे उद्या जिल्ह्यात आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता बांदा येथे निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा जंगी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर सकाळी 11 वाजता सावंतवाडी आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात राजन तेली यांचा विशेष सत्कार होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.

या स्वागत कार्यक्रमासाठी सर्व शिंदे शिवनेरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परब यांनी केले आहे. तसेच, या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने सर्व तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page