Headlines

नर्मदाआई’ तर्फे कुडाळमध्ये उद्यापासून ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सव…

कुडाळ : दीपावलीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करुन त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी आमची नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दि. १०, ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ या काळात सकाळी ११ ते ९ या वेळेत हा महोत्सव सुरु राहणार आहे.
हा महोत्सव गेली ५ वर्षे सातत्याने राबविण्यात येत आहे. दीपावलीच्या यानिमित्ताने होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार विजेती अभिनेत्री श्रद्धा प्रसाद खानोलकर आणि अभिनेत्री तथा इन्फ्लुएन्सर रुचिता शिर्के यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला जास्तीतजास्त ग्राहकांनी भेट द्यावी आणि जिल्ह्यातील व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनण्यास हातभार लावावा असे आवाहन नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळच्या अध्यक्षा संध्या प्रसाद तेरसे यांनी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page