निराधार बांधवांसाठी ‘बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळा’ कडून जीवनावश्यक वस्तूंच वाटप…!

सावंतवाडी : रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्था संचालित ‘संविता आश्रम’ (पणदूर) यांना बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाने जीवनावश्यक वस्तू मदत स्वरुपात प्रदान करण्यात आल्या. मंडळाच्या सामाजिक बांधिलकीतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष दीपक केसरकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा मदतीचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या वस्तू मंडळाचे सदस्य शैलेश गवंडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आश्रमाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमातून मंडळाने सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. ‘संविता आश्रम’ हे बेघर, निराधार व्यक्तींना आसरा देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या कार्याला हातभार लावल्याबद्दल ‘बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळा’चे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page