बांद्यात मध्यरात्री चोरट्यांचा सुळसुळाट; चार दुकाने फोडून रोकड लंपास…!

बांदा/प्रतिनिधी
बांदा दाणोली मार्गावरील विलवडे वडाकडील दोन भुसारी दुकाने आणि सलून मध्यरात्री चोरट्याने फोडून ऐवज लंपास केला. यामधून चोरट्याच्या हाती किती मुद्दे माल लागला हे पोलीस तपासात सिद्ध होणार असून बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही तिन्ही दुकाने भर वस्तीत असूनही चोरट्याने शीताफिने चोरी केली असल्याने आणि हे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती सरपंच प्रकाश दळवी यांनी बांदा पोलीस स्थानकात कळविताच पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. तेली हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा झाल्यानंतर नेमका प्रकार उघडकीस येणार आहे.
परशुराम बापू दळवी यांचे किराणा दुकान फोडून आतील 550 रुपये रोकड, दीपक नाईक यांचे टेलरिंग दुकान फोडून आतील 200 रुपये रोकड, अविनाश कदम यांचे सलून फोडून 200 रुपयांची रोकड, तर आणखी एक भुसारी दुकान फोडून आतील 1 हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबविली.

You cannot copy content of this page