सावंतवाडीतील राजकारणात नवे वारे…

राजन तेलींचे केसरकरांच्या निवासस्थानी जंगी स्वागत: निलेश राणेंच्या उपस्थितीने रंगत वाढली..

⚡सावंतवाडी ता.१०-: आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माजी आमदार राजन तेली यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यास कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे स्वतः उपस्थित राहून विशेष रंग भरला.

दरम्यान निलेश राणें आजपासून जिल्हा दौरा असून त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजन तेलींनी दीपक केसरकर यांच्या घरी येऊन केलेली भेट मोठ्या राजकीय उलथापालथीची चिन्हे दाखवत आहे.

दरम्यान राजन तेलींनी काही महिन्यांपूर्वी उबाठा सेनेतून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले दीपक केसरकर आणि राजन तेली आज एकत्र आल्याने सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याची चर्चा रंगली आहे.

You cannot copy content of this page