आमदार निलेश राणे: येणाऱ्या निवडणुकीत युती होणार की नाही याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर..
⚡सावंतवाडी ता.१०-: लहानपणापासून राजन तेली यांच्यासोबत काम करतो आहे. आमचे कधी संबंध ताणले गेले तरी त्यांनी निष्ठा अबाधित ठेवून पक्षासाठी काम केले. आज ते स्वगृही आले असून, त्यांच्या अनुभवाचा पक्षाला मोठा फायदा होईल,” असे गैरुद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले.
ते म्हणाले शिवसेनेत संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर नव्या पक्षप्रवेशाची लाट आहे. राजन तेली यांच्यासह अनेक अनुभवी कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत. “राज्यात लोकांचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे, आणि या विश्वासामुळे पक्ष अधिक सक्षम होत आहे,” असे राणे म्हणाले.
निवडणुका आणि स्थानिक विकाससिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राणे म्हणाले की, जिल्ह्यात सध्या दोन आमदार असल्याने जनतेचा प्रतिसाद अधिक उत्साहवर्धक आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे.युतीबाबत भूमिकाराज्यातील आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांबाबत युती होणार की नाही, याबाबत प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, “या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाचा आहे. आम्ही तळागाळात पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
