संजू परब:शिवसैनिक पैशासाठी विकले जाणारे नाहीत, युती झाली तरी वा वा नाही झाली तरी वा वा..
⚡सावंतवाडी ता.१०-: “मी शिवसेनेत आल्यापासून या पक्षात काय आहे ते मी पाहिले आहे. हा शिवसैनिक पैशासाठी विकला जाणारा नाही. आज इकडे उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक निष्ठावंत आणि समर्पित आहेत. राजन तेली यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे पक्षाला एक प्रशासकीय दृष्टीने अनुभवी नेता मिळाला आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला नक्कीच फायदा होणार आहे, असा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज इथे व्यक्त केले.
स्थानिक निवडणुका जवळ येऊ लागल्याने पक्षाची तयारी जोमात सुरू असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. “आमची तयारी पूर्ण आहे. युती झाली तरी वा नाही झाली तरी आम्ही सज्ज आहोत. युतीचा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून, जो काही निर्णय वरिष्ठ नेते घेतील, तो आम्हाला सर्वांना मान्य असेल,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच पुढे बोलताना परब म्हणाले, “आम्ही कुठल्याही निवडणुकीला घाबरत नाही. आम्ही लढवय्ये शिवसैनिक आहोत. आमच्यात जिंकण्याची ताकद आहे, आणि ती ताकद आम्ही पुन्हा एकदा जनतेसमोर सिद्ध करू.”शिवसेनेच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला असून, स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धारही करण्यात आला असल्याचा परब यांनी यावेळी स्पष्ट केले
