Headlines

राम मंदिर घोटाळ्याचा मारुती मंदिरात महाआरती करून निषेध

कुडाळ तालुका महाविकास आघाडीतर्फे आयोजन

कुडाळ : अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीने रविवारी सायंकाळी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात महाआरती केली.
यावेळी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, बाळा पावसकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, उल्हास शिरसाट मंदार चंद्रकांत शिरसाट, तरबेज शेख, संदेश पडते, बाळा वेंगुर्लेकर, संजय बोभाटे, बंड्या कोरगावकर, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिरासाठी आंदोलन सुरू असून प्रत्येक हिंदूच्या मनात श्रीरामाविषयी श्रद्धा आहे. श्रद्धेने भाविकांनी मंदिरासाठी हजारो कोटी रुपयांचे दान दिले. मात्र कथित गैरव्यवहारामुळे भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला गेला आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळेच आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही हे आंदोलन केले आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत आणि दानातील पैसा कुठे गेला याचा खुलासा होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,असे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page