Headlines

वेंगुर्ला तालुक्यातशिष्यवृत्ती परीक्षेत 26 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

वेंगुर्ला
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत
वेंगुर्ला तालुक्यातुन 26 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये एकूण 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व इयत्ता आठवी मध्ये एकूण 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये (8 वि )अथर्व चालोबा हरगुडे ( गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा, 81 टक्के) याने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे
प्रशालेची विद्यार्थिनी वरदा वासुदेव सामंत (76 टक्के ) हिने ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा व वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
ग्रामीण सर्वसाधारण मध्ये (5 वि ) देवदास स्वानंद मेस्त्री (दाभोली शाळा नं. 1, 79 टक्के ) तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादी मध्ये एकूण 9 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तर शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये 2 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. ग्रामीण सर्वसाधारण मध्ये देवदास स्वानंद मेस्त्री (दाभोली शाळा नं. 1, 79 टक्के ), भूमी आत्माराम परब (आडेली खुटवळवाडी शाळा नं. 2), प्रणय प्रशांत परब (वजराट शाळा नं 1), शुभम मिलिंद परुळेकर (परुळे शाळा नं. 3), सानवी सहदेव परब (परबवाडा शाळा नं. 1), कृष्णा सहदेव चव्हाण (परुळे शाळा नंबर 3), स्वरा समीरचंद्र दळवी (होडावडा भोज शाळा ), यश संजय परब (वजराट शाळा नं. 1), चंद्रकांत सिताराम जुवेकर ( होडावडा न्हयकर शाळा ) इत्यादी विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. तर शहरी सर्वसाधारण मध्ये रेयांश संदीप कोळसुलकर (वेंगुर्ला शाळा नं. 3) व हर्षवर्धन विष्णू खेडकर (वेंगुर्ला शाळा नं. 1) यांनी यश मिळवले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये अथर्व चालोबा हरगुडे (अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा, 81 टक्के ) याने यश मिळविले आहे. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये वरदा वासुदेव सामंत ( अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे), वेद अभिषेक वेंगुर्लेकर (श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ), वैदेही प्रसाद पवार ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ), चैतन्य सुहास परुळेकर (परुळे हायस्कूल), हार्दिका लवू सातार्डेकर (शिरोडा हायस्कूल), वैष्णवी सुनील जाधव (कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली), आदिनाथ दत्तप्रसाद सामंत (परुळे हायस्कूल), समर्थ दिपक राणे( श्री माऊली विद्यामंदिर रेडी), प्राची शंकर गवंडी ( श्री माऊली विद्यामंदिर रेडी), प्रांजल ज्ञानेश सावंत ( श्री माऊली विद्यामंदिर रेडी ). दूर्वांक रामचंद्र मालवणकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन स्कूल ),आयुषी सचिन धुरी (श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ), हर्षदा निलेश धुरी (अणसुरपाल हायस्कूल )यांनी यश मिळवले आहे. शहरी सर्वसाधारण मधून विजय दिनेश तुळसकर( मदर तेरेसा स्कूल ) याने यश मिळविले आहे. सर्व शिष्यवृत्तीप्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर आदिनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page