कुडाळ : तालुक्यात झाराप तिठा येथील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यानी इअरबड्स व अन्य साहित्य आणि रोख ५ हजार मिळून १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शॉपी मालक वैभव गुरुनाथ कांडे (27) रा वजराट कांदेवाडी यांनी कुडाळ पोलीसांत खबर दिली आहे.
बुधवारी रात्री नऊ वा ते आज गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या मुदतीत चोरट्याने मोबाईल शॉपी व आजूबाजूच्या गाळ्यांचे लॉक तोडून आतील इअरबड्स व अन्य साहित्य रोख रक्कम चोरून नेली. भारतीय न्याय संहिता 334 (1) 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हे कॉ अनिल पाटील करीत आहेत
दरम्यान कुडाळ शहतत गेल्या काही दिवसात छोट्या चोऱ्या झाल्या असून त्याबाबत संबंधितानी पोलीसांत तक्रार दिली नाही. तालुक्यातील ग्रामिण भागातही छोट्या चोऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याबाबत पोलीसांत तक्रार दाखल केली जात नाही. दुकाना बाहेर ठेवलेल्या वस्तू घराच्या परिसरातील साहित्य बाजारपेठ भागातील बॅनर यांचीही चोरी होऊ लागली आहे. चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तक्रार दिली जात नसल्याने भुरट्या चोरांचे मनोध्यैर्य वाढत चालले आहे.
झाराप तिठा येथे मोबाईल शॉपीत चोरी…
