Headlines

नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन…

⚡बांदा ता.१९-: येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणे यांच्या तर्फे भेट देण्यात आली. प्रशाळेतील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना पुढील करीअर विषयक मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील रिसर्च संशोधन अंतर्गत विद्यार्थ्यांकडून विविध माहीती घेण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शाळेमध्ये एम.एस.ए.टि हा कौशल्य विकास विषय सुरू आहेत या…

Read Full News

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बांदा नंबर १ शाळेचे घवघवीत यश…

⚡बांदा ता.१९-: सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पीएमश्री केंद्रशाळा बांदा नंबर १ शाळेच्या संघांनी व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली.स्पर्धेतील यशस्वी संघ व विद्यार्थी पुढीलप्रमाणे —लहान गट मुलगे खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मोठा गट मुलगे खो-खो…

Read Full News

कुणकेरी–कशेलवाडी रस्ता मजबुतीकरणाचे भूमिपूजन संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१९-:कुणकेरी–कशेलवाडी रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आज सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँकेचे संचालक श्री. महेश सारंग यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या वेळी सिंधुदुर्ग बँकेचे संचालक श्री. गजानन गावडे, कुणकेरीच्या सरपंच श्रीमती सोनिया सावंत, उपसरपंच श्री. सुनील परब, ग्रामपंचायत सदस्य माधवी मेस्त्री व अंकिता सावंत, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. बाळकृष्ण सावंत, बुथ…

Read Full News

ई- पीक पाहणी नोंद करा…

ऐश्वर्या काळूशे:नोंद राहिलेल्या शेतकऱ्यांना २४ डिसेंबर पर्यंत संधी,ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे करणार स्थळ पाहणी.. ⚡कुडाळ ता.१९-: ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत असेही आवाहन उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांची अचानक भेट…

⚡कणकवली ता.१९-: येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या सरप्राईज व्हिजिटमुळे रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या भेटीदरम्यान जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी रुग्णालयातील एकूण कामकाजाचा सखोल आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता, अधिकारी व कर्मचारी वेळेवर ड्युटीवर उपस्थित आहेत…

Read Full News

सावंतवाडी शहरात ‘जॉयसी ब्यूटी पार्लर’चे आज उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१९-:सावंतवाडी शहरात महिलांसाठी सौंदर्यसेवेचे नवे दालन खुले होणार असून ‘जॉयसीज ब्यूटी पार्लर’ या नव्या पार्लरचे भव्य उद्घाटन आज होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे पार्लर ग्राहकांसाठी खुले राहणार आहे.सावंतवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंट, खासकीलवाडा, शॉप नं. ५ येथे हे पार्लर सुरू होत असून आधुनिक पद्धतीच्या सौंदर्यसेवा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत….

Read Full News

सावंतवाडीत ‘सिंधु यंग चॅम्पियन रन’ मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन…

७ ते २१ वयोगटातील मुलांसाठी चार गटांत स्पर्धा; २८ डिसेंबरला राजवाडा परिसरात आयोजन.. सावंतवाडी : सिंधु यंग चॅम्पियन रन मॅरोथॉन स्पर्धा सावंतवाडीत होत आहे. ७ वर्ष ते २१ वर्षांमधील ४ गटात ही स्पर्धा होणार आहे‌. मुलांना ॲथलेटिक्स, स्पर्धांची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आम्ही राबवत आहोत अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले…

Read Full News

कणकवलीत आरोग्य व्यवस्थेवर चिंतन बैठक…

२० डिसेंबरला पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची घेणार भेट.. कणकवली : डॉ. नागवेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिचा कोल्हापूर येथे झालेला दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर जमावाकडून नागवेकर हॉस्पिटलची झालेली तोडफोड या दोन्ही घटना दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम झाली असती तर किरकोळ शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ…

Read Full News

एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी’ विषयावरील एआईसीटीई – प्रायोजित अटल एफडीपीचे आयोजन…

⚡कणकवली,ता.१८-:एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे “क्वांटम टेक्नॉलॉजी : ट्रान्सफॉर्मटिव्ह अॅप्रोच फॉर नेक्स्ट जनरेशन कम्प्युटिंग” या विषयावर एआयसीटीई प्रायोजित अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) ऑनलाइन पद्धतीने ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला देशभरातील विविध शैक्षणिक संस्था, संशोधन संस्थांचे संशोधक तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांकडून ३०० हून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या…

Read Full News

नेरूर येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या…

कुडाळ : नेरूर समता नगर येथील 21 वर्षीय जीवन दीपक कदम या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नेरूर समता नगर येथील जीवन दीपक कदम याने आपल्या राहत्या घरी घराच्या वाशाला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page