नेरुर येथील दंतमुख तपासणी आणि आरोग्य जनजागृती शिबिराला चांगला प्रतिसाद…

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे मोफत शिबीर..

⚡कुडाळ ता.०४-: एशियन कॅन्सर फाऊंडेशन, बॅ नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरुर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकायने ‘मोफत दंतमुख तपासणी व आरोग्य जनजागृती शिबीर’ नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर (जुने इंगेश हॉस्पिटल) शनिवारी संपन्न झाले. या शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबिरासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून एशियन कॅन्सर फाऊंडेशन चे नामांकित डॉक्टर; डॉ. सागर शर्मा (कर्करोग तज्ज्ञ), डॉ. श्रवण शेट्टी (कर्करोग तज्ज्ञ), उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करतात डॉक्टर सागर शर्मा व डॉक्टर श्रवण शेट्टी यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या व कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्राच्या सहकार्याने अशा प्रकारची शिबिर आयोजित करताहेत ही फार समाधानंची आणि कौतुकास्पद बाब असल्याचे नमूद करत शिबिरासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. सागर शर्मा व डॉ. श्रवण शेट्टी यांच्यासहित बॅ.नाथ पै फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रत्युषरंजन बिस्वाल, बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, वैशाली ओटवणेकर, प्रसाद कानडे, डॉ.ठाकूर, आशा स्वयंसेविका इत्यादी उपस्थित होते.
एकूण 90 गरजू लोकांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा वैशाली ओटवणेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page