Headlines

सावंतवाडीत भक्तीरसाचा महोत्सव; इस्कॉनतर्फे भव्य भजनसंध्येचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-:आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ (इस्कॉन), सावंतवाडी शाखेच्या वतीने रविवार, २१ डिसेंबर रोजी शहरात भव्य ‘भजनसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हा सोहळा रंगणार असून, यानिमित्ताने अध्यात्मिक विचारांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. ​कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रमुख उपस्थिती ​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इस्कॉनचे जगदविख्यात गुरु…

Read Full News

रियाज खान यांची शिंदे युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुखपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.१९-: शिंदे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदावर श्री. रियाज खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी जाहीर केली आहे.हे नियुक्तीपत्र आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे…

Read Full News

देवगडमध्ये २० डिसेंबरला महास्वच्छता अभियान; सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन…

⚡देवगड ता.१९-:जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती देवगड यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यात दिनांक २० डिसेंबर रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत देवगड तालुक्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे. देवगड तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखला जात असल्याने स्वच्छता व…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईनंतर देवगड जामसंडे जलवाहीनी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू…

⚡देवगड ता.१९-:देवगड जामसंडे नळ योजनेच्या मागील कामाचे ८९ लाख रूपये येणे असल्याने ठेकेदार अडून बसला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे पाण्याचा गंभीर प्रश्न असूनही नगरसेवक व प्रशासन मुग गप्प गिळून होते. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या नंतर शुक्रवारी सकाळपासून दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू झाले असूनशहरातील जनतेला शनिवारपासून पाणीपुरवठा होणार आहे. ठेकेदाराचे मागील ८९ लाख…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१९-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Read Full News

शिरशिंगे येथे काजू बागायतीला भीषण आग…

सावंतवाडी,दि.१९: सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास काजू बागायतीला लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंकुश रामा धोंड, रमेश रामा धोंड आणि सुरेश रामा धोंड यांच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने धोंड कुटुंबियांचा हाताशी आलेला घास हिरावला गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी…

Read Full News

पडवे सरपंच आनंद दामोदर यांच्यावरील अविश्वास ठराव जनतेच्या न्यायालयात मंजूर…

पण कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाच्या निर्णयानंतर होणार अंतिम शिक्कामोर्तब.. ओरोस ता १९कुडाळ तालुक्यातील पडवे सरपंच आनंद शंकर दामोदर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ३२८ विरुद्ध २०२ मतांनी मंजूर झाला आहे. त्यामुळे सरपंच दामोदर हे अपात्र ठरले आहेत. दरम्यान, दामोदर यांनी या अविश्वास ठराव ग्रामसभे विरोधात कोल्हापूर खंडपीठाकडे अपील दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने दाखल…

Read Full News

स्वराज्य दिव्यांग संस्थेचा नववर्ष कॅलेंडर प्रकाशन व साधन वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न…

दिव्यांगांना सहानुभूती नव्हे, हक्कांची गरज; सिताराम गावडे.. ⚡सावंतवाडी ता.१९-: स्वराज्य दिव्यांग संस्था, सावंतवाडी तालुका यांचा नववर्ष कॅलेंडर प्रकाशन व दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधनांचे वाटप कार्यक्रम येथील काझी सभागृहात मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सकल हिंदू मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्हचे संपादक श्री. सीताराम गावडे, राजे प्रतिष्ठानचे संतोष…

Read Full News

वाफोली–विलवडेतील क्वारी-क्रशरविरोधात ग्रामस्थांचा लढा; २१ डिसेंबरला तातडीची बैठक…

⚡बांदा ता.१९-: वाफोली-विलवडे परिसरातील सुरू असलेल्या क्वारी व क्रशरच्या विरोधात रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वाफोली ग्रामस्थांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांच्या निवासस्थानी होणार आहे.वाफोली–विलवडे येथील क्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे वाफोली गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून नागरिकांच्या घरांना गंभीर धोका…

Read Full News

प्रसिद्ध योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्रीय शिक्षा रत्न सन्मान २०२५’ प्रदान…

⚡बांदा ता.१९-: प्रसिद्ध योगशिक्षक, फिटनेस योग अकॅडमीचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक शेखर बांदेकर यांना ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया ई-मॅगझिनतर्फे ‘योग शिक्षण आणि जनजागृतीमधील उत्कृष्टता’ या श्रेणीत प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षा रत्न सन्मान २०२५ प्रदान करण्यात आला आहे.योग शिक्षण, आरोग्यविषयक जनजागृती आणि सामुदायिक कल्याणासाठी त्यांनी राबवलेल्या सातत्यपूर्ण, सर्वसमावेशक उपक्रमांची दखल घेत हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान देण्यात आला….

Read Full News

You cannot copy content of this page